सचिन बनसोडे साम टीव्ही, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मांजरीला वाचवताना (Cat Rescue) पाच जणांचा विहीरीत बनवलेल्या शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. शेण - मुत्र टाकण्यासाठी हा शोषखड्डा बनवण्यात आला होता. यामध्ये पाचजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
मांजर शोषखड्ड्यात पडली होती. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला, तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले. बायोगॅसचा खड्डा शेणाने (Ahmednagar News) भरलेला होता. विहिरीतील विषारी वायूने गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये ९ एप्रिल रोजी घडली होती. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली (People Drowned In Biogas Pit) आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकजणाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, इतर पाचजणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
गावकऱ्यांनी शोष खड्ड्यात बुडालेल्या एकाला बाहेर काढलं होतं. त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी नेवासा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं (Ahmednagar News Cat Rescue) आहे. ही व्यक्ती बायोगॅसच्या खड्ड्यात असलेल्या गॅसमुळे चक्कर येऊन बुडाल्याची माहिती मिळत आहे. अन्य ५ जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.
आपत्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल (crime news) काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.
मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये ९ एप्रिल रोजी घडली होती. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली (Ahmednagar Crime) आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकजणाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, इतर पाचजणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.