Chance Perdomo Death: प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; वयाच्या २७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Chance Perdomo latest News : दक्षिण सिनेसृष्टीतील स्टार डेनियल बालाजी यांचं निधनानंतर आणखी एका अभिनेत्याचा दुर्देवी घटना समोर आली आहे. हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चांस पेरडोमो यांचं अपघाती मृत्यू झाला आहे.
Chance Perdomo Death:
Chance Perdomo Death: Social Media

Chance Perdomo Death:

दक्षिण सिनेसृष्टीतील स्टार डेनियल बालाजी यांचं निधनानंतर आणखी एका अभिनेत्याचा दुर्देवी घटना समोर आली आहे. हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चांस पेरडोमो यांचं अपघाती मृत्यू झाला आहे. अभिनेता चांसच्या मृत्यूमुळे चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

चांस पेरडोमोच्या मृत्यूमुळे चाहते शोकसागरात बुडाले आहे. चांसने 'जेन वी मूमिन वॅली' आणि 'अफ्टर वी फेल'सहित अनेक वेब सीरीजमध्ये काम केलं आहे.

Chance Perdomo Death:
रमजान महिन्यात Sara Ali Khan ने गरिबांना केलं अन्नदान, पापाराझींना पाहून संतप्त झाली अभिनेत्री; VIDEO व्हायरल

चांस पेरडोमोचे प्रमोटर यांनी निवदेन जाहीर करत त्यांच्या निधनाची वार्ता सांगितली. त्यांनी सांगितलं की, 'मला सांगताना दु:ख होत आहे की, एका दुचाकी अपघातात चांस पेरडोमोचा मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर कोणीही जखमी झालेलं नाही'.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

चांस पेरडोमोने फार कमी वयात जगाचा निरोप घेतला. चांस पेरडोमोच्या प्रमोटरने पुढे म्हटलं की, 'चांस हा सर्वांवर प्रेम व्यक्त करायचा. तुम्ही त्याच्या कुटुबीयांच्या गोपनीयतेच्या इच्छेचा आदर ठेवा. त्याचं कुटुंब मुलगा आणि भाऊ गमावल्याने फार दु:खी आहे.

अपघाताचं कारण समोर आलेलं नाही

मीडि रिपोर्टनुसार, अभिनेता चांसचा अपघात कुठे आणि कधी झाला, याविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. चांसचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाल्याने त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chance Perdomo Death:
Sai Lokun: आपण कोणत्या समाजात राहतोय?, आई झाल्यानंतर वाढत्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरने दिलं जशाच तसं उत्तर

शॉर्ट फिल्मपासून करिअरला सुरुवात

चांसने फार कमी वयात अभिनय करण्यास सुरुवात केली. त्याने वयाच्या १९ व्या वर्षी 'लाँग फील्ड ड्राइव्ह' या शॉर्ट सिनेमातून अभिनयातील करिअरला सुरुवात केली. त्याचा पहिला सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झाली होती. चांसला खरी ओळख 'अफ्टर वी फेल' या वेब सीरीजमुळे मिळाली. तसेच त्याने अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com