Sai Lokun: आपण कोणत्या समाजात राहतोय?, आई झाल्यानंतर वाढत्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरने दिलं जशाच तसं उत्तर

Sai Lokur Answered To Trollers: बाळ झाल्यानंतर सई लोकूर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सईवर तिचे चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. बाळ झाल्यानंतर सई लोकूर खूपच जाड झाली आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
Sai Lokur Answered To Trollers
Sai Lokur Answered To TrollersSaam Tv

Sai Lokur Trolled:

बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाइम इन्जॉय करत आहे. सई लोकूरने १७ डिसेंबरला मुलीला जन्म दिला. सईने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. सईने आपल्या मुलीचं नाव 'ताशी' असं ठेवलं आहे. बाळ झाल्यानंतर सई लोकूर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सईवर तिचे चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. बाळ झाल्यानंतर सई लोकूर खूपच जाड झाली आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. या ट्रोलर्सला सईने चांगलंच उत्तर दिलं आहे.

सई लोकूर आई झाल्यानंतर खूपच जाड झाली आहे. जाड झाल्यामुळे तिला गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये या ट्रोलर्सला सईने त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने असे लिहिले आहे की, 'लोकांना जाड आणि बारीक याशिवाय दुसरं काही दिसतच नाही का?, असा संतप्त सवाल सईने विचारला.

पुढच्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'गरोदरपणानंतर स्त्रीला साधारणत: 6 महिन्यांची सुट्टी मिळते. जणे करून त्या स्वत:ची आणि आपल्या बाळाची काळजी घेऊ शकतील. पण मी माझ्या डिलीव्हरीनंतर ३ महिन्यांतच कामाला सुरुवात केली. एखाद्या ब्रँडचं कोलॅबोरेशन करणं, वेळ काढून व्हिडिओ शूट करणं या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करतेय. पण नवीन आईच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी लोकांना माझं जाड शरीरच दिसत आहे. ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजात राहतोय? एकमेकांना सहकार्य करण्यापेक्षा एकमेकांना मागे खेचण्यात आपल्याला जास्त रस वाटतो.'

Sai Lokur Post
Sai Lokur Post Saam Tv

सईने तिसऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'कृपया बाळाच्या जन्मानंतर पहिल्या वर्षी एखाद्या स्त्रीशी सौम्यपणे वागा. तिला सर्वात असुरक्षित वाटू लागले आहे. तिला फक्त प्रेम आणि समर्थनाची गरज आहे.' सध्या सोशल मीडियावर सई लोकूरच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, बाळ झाल्यानंतर सईला आणि तिच्या मुलीला भेटण्यासाठी अनेक जण तिच्या घरी जात आहेत. अशामध्ये काही दिवसांपूर्वी सई लोकूरच्या जीवलग मैत्रिणी मेघा धाडे आणि शर्मिष्ठा राऊत यांनी तिची भेट घेतली होती. बिग बॉसच्या घरामध्ये या तिघींची मैत्री झाली होती. सईच्या लग्नाला देखील त्यांनी हजेरी लावत धम्माल केली होती. सईने आपल्या मैत्रिणींसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा देखील सईला तिच्या जाडपणावरून ट्रोल करण्यात आले होते. यावर देखील सईने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले होते.

Sai Lokur Answered To Trollers
संजय लीला भन्सालींच्या Heeramandi मध्ये वापरण्यात आले खरे दागिने, रिचा चड्ढाने केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com