kolhapur police appeals reels star to follow law
kolhapur police appeals reels star to follow law Saam Tv
महाराष्ट्र

Reels चा नाद पडेल भारी, करावी लागेल पाेलिस ठाण्याची वारी;कोल्हापुरात विशेष माेहिमेस प्रारंभ

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

कोल्हापूर शहरातील गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्राचा धाक दाखवणे यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पाेलिस ठाण्यात बाेलावून समज दिली. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांना केवळ समजच दिली नाही तर आपल्या स्टाईलनं डोस दिल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात हाेती.

कोल्हापूर शहर आणि परिसरातील मोक्का तसच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात एकत्र आणलं. या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी खरपूस समाचार घेतला.

गुन्हेगारांची उठबस कुठे आहे. त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत. सध्या ते कोणत्या व्यवसायात आहेत. यासंबंधी पोलिस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं. या गुन्हेगारांसंदर्भात किरकोळ तक्रार जरी प्राप्त झाली तरी त्यांची गय केली जाणार नाही अशी सूचना वजा इशाराच टिकेंनी दिला.

यासोबतच एकमेकांना सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आव्हान देऊन टोळी युद्ध घडल्यास अशा रिल्स स्टारवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: नाफेडचे कांदा खरेदी प्रमुख सुनील कुमार सिंग यांची उचलबांगडी?, साम टिव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट

Jiya Shankar: अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जिया शंकरचं मनमोहक सौंदर्य

Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर

PM Modi Meets Team India: पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् टीम इंडियातील खेळाडूंमध्ये काय चर्चा झाली? पाहा VIDEO

Saam Impact Video: NCCF ने थांबवली कांद्याची खरेदी; घोटाळ्याच्या वृत्तानंतर 67 महासंघांची खरेदी बंद; साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट

SCROLL FOR NEXT