kolhapur haddwadh kruti samiti call off kolhapur bandh on 27 june cm eknath shinde tour  Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Bandh : कोल्हापुरच्या हद्दवाढीसाठी शहर बंद ठेवू, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार; कृती समितीचा इशारा

kolhapur haddwadh kruti samiti call off kolhapur bandh on 27 june: राज्यकर्ते काेल्हापूरच्या हद्दवाढीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची खंत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक प्रवीण इंदुलकर यांनी व्यक्त केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

वर्षानुवर्ष कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला अद्याप सरकार न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काेल्हापूर दाै-यात काळे झेंडे दाखविले जातील अशी माहिती कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक प्रवीण इंदुलकर यांनी दिली. दरम्यान काेल्हापूरच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी येत्या 27 जूनला काेल्हापूर बंदची हाकही देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जूनपासून काेल्हापूर दाै-यावर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाै-याच्या पार्श्वभूमीवर काेल्हापूरात रिक्षा व्यावसायिकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 25 जूनला शहरातील रिक्षा व्यवसाय बंद ठेवण्याची घाेषणा केली आहे.

त्यापाठाेपाठ आता कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने देखील मुख्यमंत्र्यांच्या दाै-यात हद्दवाढीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदाेलनाची तयारी सुरु केली आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक प्रवीण इंदुलकर म्हणाले सन 1946 पासून कोल्हापुरची हद्दवाढ रखडली आहे.

सन 2001 कालावधीत सध्याचे मुख्यमंत्र्यानी महापालिकेला हद्दवाढीचा प्रस्ताव मागितला हाेता. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काेल्हापूरच्या हद्दवाढीच्या केवळ वलग्ना केल्याचे इंदुलकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT