Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime: रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल चोरी; दोन सराईट चोरटे गजाआड

Kalyan News : कल्याण पोलिसांनी तपास करत राम प्रवेश सहानी आणि विशाल सुरवाडे अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे आहेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: रेल्वेने प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. धावत्या रेल्वेत काही प्रवाशी (Kalyan) दरवाजात बसलेले असतात. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पसार होत असतात. तसेच प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशांचे देखील मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी होत्या. यावरून (Railway Police) पोलिसांनी दोन चोरट्याना ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्या तसेच मेल एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल (Theft) चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या होत्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अर्चना दुसाणे, पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख, ए. व्ही जावळे, जी. व्ही राणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण पोलिसांनी तपास करत राम प्रवेश सहानी आणि विशाल सुरवाडे अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी या दोघांकडून काही मोबाईल हस्तगत केले आहे. पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT