सागर निकवाडे
नंदूरबार : सरकारला अंगणवाडी सेविका भगिनींच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मात्र अंगणवाडीमध्ये बालकांना आणि गर्भवती मातांना देण्यात (Nandurbar) येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. या पोषण आहाराची टक्केवारी खाण्यात सरकार व्यस्त आहे. अंगणवाडीमध्ये (Anganwadi Workers) पुरवठा होणारे धान्य कीड लागलेले आणि खराब असून त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने नंदुरबार सारख्या आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचा समोर धरणे आंदोलन केले असून या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आमदार आमश्या पाडवी यांनी महिला बालकल्याण विभाग आणि राज्य सरकारवर आरोप केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विधानपरिषदेत आवाज उठविणार
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. तीन महिन्यापेक्षा १३८ बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकार या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. महिला बालकल्याण व आरोग्यमंत्र्यांनी अजूनही जिल्ह्याच्या कुपोषणग्रस्त भागांना भेटी दिलेल्या नाही. मात्र पोषण आहाराच्या नावाखाली टक्केवारी खाण्यात सरकार व्यस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार पाडवी यांनी केला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठवणार असून महिला बालकल्याण विभागाचा टक्केवारीचा कारभार समोर आला असला तरी कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.