- रणजीत माजगावकर
Kolhapur Shivsena News : कोल्हापूरातील रस्ते चांगले असावेत या मागणीसाठी आज (मंगळवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेत आंदाेलन केले. दरम्यान पाेलीसांनी आंदाेलक आणि अधिकारी यांच्यात मध्यस्थी केल्याने महापालिकेतील तणाव निवळला. (Maharashtra News)
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन ही शहरातील रस्ते खड्डे मुक्त झालेले नाहीत. म्हणूनच आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी शिवसैनिकांना घेऊन थेट महापालिकेत शिरून अधिकाऱ्यांच्या समोरच त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांना घेराव घातला. तसेच त्यांना दुचाकीवर बसवुन शहर फिरवण्याचा इशाराही दिला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत याबाबत उद्या (बुधवार) शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी ग्वाही मनपा अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आंदाेलनात संजय पवार (ठाकरे गटाचे उपनेते) आणि विजय देवणे (सह संपर्क प्रमुख) यांच्यासह उबाठाचे शिवसैनिक सहभागी झाले हाेते. या आंदोलनामुळे (aandolan) काही काळ महापालिकेत तणाव निर्माण झाला होता.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.