Satara News : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष तसेच गटांची सरशी झाल्याचे पाहवयास मिळत आहे. प्राथमिक टप्प्यातील निकालात सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या तालुक्यात वर्चस्व सिद्ध केले. यंदाच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटास सत्ताधारी आमदारांनी काही प्रमुख ग्रामपंचायतीत धूळ चारली.(Maharashtra News)
कोरेगाव तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायतीवर सात पैैकी शिवसेना आमदार महेश शिंदे (mla shashikant shinde) गटाच्या तुकाईमाता ग्रामविकास पॅनेल सरपंचासह सहा जागांवर विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदार शशिकांत शिंदे गटाला माेठा धक्का बसला आहे.
सातारा तालुक्यातील धावडशी ग्रामपंचायतीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यातील दोन गट आमने सामने होते. त्यापैकी एका गटाला तीन जागा आणि सरपंचपद तर दुसऱ्या गटाला सहा जागा मिळाल्या आहेत.
आनेवाडीत सत्तांतर
सत्ताधारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला धूळ चारत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने आनेवाडी ग्रामपंचायतीवर 7-3 अशा फरकाने बाजी मारली.
सातारा मतदान झालेल्या ग्रामपंचायती 78 (सर्व निकाल हाती)
शरद पवार गट 19 जागांवर विजयी
अजित पवार गट 18
भाजप 17
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट 17
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काँग्रेस 05
इतर 02
उद्धव ठाकरे गट 00
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.