nitesh rane & vinayak raut
nitesh rane & vinayak rautsaam tv

Maratha Aarakshan : मनाेज जरांगे पाटलांना धमकविणा-या नितेश राणेंची मराठा समाजाने दखल घ्यावी : खासदार विनायक राऊत

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
Published on

- विनायक वंजारे

Sindhudurg News : नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नितेश राणे आहेत. एकीकडे संरक्षण द्या अशी मागणी करायची आणि दुसरीकडे धमकवायचे अशी दुतोंडी भुमिका नितेश राणेंची आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर केली. खासदार विनायक राऊत हे आज सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

nitesh rane & vinayak raut
Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

खासदार राऊत (vinayak raut) म्हणाले ३१ डिसेंबर ही अपात्रतेची डेडलाईन असल्यामुळे शिंदे सरकारने आपलं राजकीय निवृत्तीचं मरण पुढे ढकलण्यासाठी जरांगे पाटलांवर दबाव टाकून मराठा आरक्षणावर २ जानेवारीची मुदत वाढ घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. निवृत्त न्यायाधीश अथवा ज्यांचा मराठा आरक्षणाबाबत संबंध नसताना सरकारने असे लाेक मनाेज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवली. त्यानंतर झालेल्या चर्चेतून हा विषय पुन्हा काही दिवस पुढे गेल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane & vinayak raut
Grampanchayat Election Result 2023 : काेकण आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला : राणे; प्रतिष्ठेच्या लढाईत वैभव नाईकांचा करिष्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com