KDMC News: प्रदूषणास जबाबदार बांधकाम प्रकल्पांना बजावणार नोटिस; तर केडीएमसीकडून दंडात्मक कारवाई

Kalyan News : बांधकामधारक या नोटिसाप्रमाणे उपाययाेजना करणार नाही. त्यांना प्रत्येकी २५ ते ५० हजार रुपये दंड आकारला जाणार
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केडीएमसी (KDMC) नोटीस बजावणार आहे. तसेच महापालिकेने लावून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास (Kalyan) त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. (Latest Marathi News)

KDMC News
Dhangar Reservation: बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर; राज्य सरकारला दिला गंभीर इशारा

कल्याण- डोंबिवली शहरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. महापालिकेच्या हद्दीत हवेची गुणवत्ता कालच्या तारखेत २१५ इतकी गणली गेली आहे. ही नोंद खराब हवा असल्याची आहे. हवेची गुणवत्ता खालावण्यास विविध कारणे जबाबदार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हवा प्रदूषणाच्या (Pollution) संदर्भात मुंबई महापालिकेस फटकारले आहे. तसेच एमएमआर रीजनमधील महापालिकांच्या हद्दीतही प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन काही सूचना केल्या होत्या. न्यायालयाने ज्या काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या धर्तीवर (Dombivali) आज महापालिका मुख्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त चितळे यांच्यासह वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मंदार धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त कल्याण जी घेटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक उप अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांच्यासह एमसीएचआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KDMC News
Bribe Trap: नाकाबंदी करत अडवलेले वाहन सोडवण्यासाठी एक लाखाची मागणी; पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक

असे लावले आहेत नियम 

केडीएमसी अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी बड्या गृहसंकुलाच्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी रेती, विटा आणि सिमेंट हे साहित्य आणले जाते. या साहित्याच्या गाड्या बंदीस्त असाव्यात. तसेच बांधकामाच्या साईटवर शेड नेट असावी. तसेच बांधकामाच्या ठिकाणी ३० ते ३५ फूटाचे पत्रे चहूबाजूने ठोकलेले असावेत. त्यामुळे धूळ उत्सर्जीत होणार नाही. तसेच बांधकामाच्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला जावा; आदी सूचना असलेल्या नोटिसा बांधकामधारकांना तातडीने पाठविल्या जाणार आहे. जे बांधकामधारक या नोटिसाप्रमाणे उपाययाेजना करणार नाही. त्यांना प्रत्येकी २५ ते ५० हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचे चितळे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com