बीड : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, या मागणीसाठी बीडमध्ये भंडारा उधळत..हातात कुऱ्हाड घेवून (Beed) हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत. १२ तारखेच्या अगोदर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) निर्णय घेतला नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे. (Tajya Batmya)
सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर (Maratha Aarkshan) मराठा समाज आक्रमक झाला होता. त्याच पद्धतीने आता धनगर समाज देखील मुदत जवळ आल्याने सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर दिवाळी गॉड होऊ देणार नाही
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात धनगर बांधवांचे आंदोलन होत आहेत. चौंडी येथे सुरू केलेल्या आंदोलनानंतर सरकारने मागितलेली वेळ आता १२ तारखेला संपत असल्याने बीडमध्ये सकल धनगर समाज आक्रमक झाला असून विराट मोर्चा काढला. धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही.. तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही सोन्नर यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.