KDMC News: त्या दोन गावातील बांधकामांचे प्राथमिक स्तरावर करणार सर्वेक्षण; २७ गावातील अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा

Kalyan News : त्या दोन गावातील बांधकामांचे प्राथमिक स्तरावर करणार सर्वेक्षण; केडीएमसीत २७ गावातील अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी (Kalyan) शासनाने समिती नेमली आहे. या समितीची आज २७ गाव संघर्ष समिती, ग्रामस्थांसह केडीएमसी (KDMC) मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या गावांमधील सोनारपाडा व आडीवली ही दोन गाव प्राथमिक स्तरावर निवडण्यात आली. या गावांमधील बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीने सांगितले. (Maharashtra News)

KDMC News
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा गंभीर; तीन दिवसात दुसरी घटना

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील वाढीव मालमत्ता कराचे फेर मूल्यांकन व अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. या समितीची २७ गाव संघर्ष समिती पदाधिकारी (Dombivili) ग्रामस्थासोबत मालमत्ता कर फेर मूल्यांकनाबाबत बैठका झाल्या. आज २७ गावातील (KDMC 27 Villages) अनधिकृत बांधकामासंदर्भात या समितीचे बैठक झाली. या बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गंगाराम शेलार, गजानन मांगरूळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KDMC News
Gondia Accident News: भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू; अब्दुल टोला गावाजवळची घटना

२७ गावातील बांधकामे कशी अधिकृत आहेत याची माहिती शासनाच्या कमिटी समोर मांडली आहेत. एमएमआरडीए, एमआयडीसीचे अधिकारी देखील असावेत अशी मागणी केली. या गावातील अनधिकृत बांधकाम झाली आहेत. त्याला जबाबदार संबंधित यंत्रणा आहेत, जेव्हाही गाव वगळली त्यावेळेला या गावांमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी नव्हती. दहा वर्षांनी एमएमआरडीए आली ही बाब समिती समोर मांडली. अनधिकृत बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी सोनारपाडा व आडीवली या दोन गावांची निवड करण्यात आली. या गावात बांधकामे कशा पद्धतीने झाली, चाळी किती आहेत, इमारती किती आहेत याचा सर्वे करण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर २७ गावातील अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय होईल; अशी अपेक्षा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com