Mumbai Train News - 8 November 2023
Mumbai Train News - 8 November 2023saam tv

Central Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाहतूक खोळंबल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

Central Railway News: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे.
Published on

सुनील काळे

Central Railway News:

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवरील कळवा स्टेशनवर आव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कळवा स्टेशनवर आव्हरहेड वायर तुटल्याची माहीती मिळाली आहे. यामुळे कर्जत आणि कसाराहून येणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणे स्टेशनदरम्यान खोळंबल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Train News - 8 November 2023
Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे ११ निर्णय; धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी समिती नेमणार

कळवा स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने फास्ट ट्रेन या स्लो ट्रॅकवरून वळवल्या जात आहेत. दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच डाऊन फास्ट लाईन पुढील घोषणा होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Mumbai Train News - 8 November 2023
Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांना विराेध, पंढरपुरात मंदिर समितीची बैठक उधळली (पाहा व्हिडिओ)

प्रवाशांचे हाल

रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. १५ ते २० मिनिटे ट्रेन उशिरा असल्याने प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहावी लागत आहे. मध्य रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनवर काही प्रमाणात प्रवाशांची गर्दीही झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com