Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे ११ निर्णय; धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी समिती नेमणार

Cabinet Meeting Today: नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जाणार आहेत.
11 Maharashtra Cabinet Meeting Decision - Maharashtra News Today (8 November 2023
11 Maharashtra Cabinet Meeting Decision - Maharashtra News Today (8 November 2023Eknath Shinde Government - Saam TV
Published On

रुपाली बडवे

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे ११ निर्णय

(11 Important Decisions In Today's Cabinet Meeting)

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाची बैठक आज पार पडली. नागरिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार समिती नेमत आहे. समिती गठीत झाली तर आणखी योजना लागू करण्यास मदत होणार आहे.

याशिवाय नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जाणार आहेत. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ करण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीत इतर निर्णय

  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण)

  • राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता. (उद्योग विभाग)

  • मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)

  • अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार. (वैद्यकीय शिक्षण)

  • मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. (वस्त्रोद्योग विभाग)

  • गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार. (इतर मागास बहुजन कल्याण )

  • विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा. (सहकार विभाग)

  • मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार. (पर्यटन विभाग)

  • बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार. (गृह विभाग)

  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार. (पशुसंवर्धन)

  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com