KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : प्रभाग अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई; आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकामाची करणार पाहणी

Kalyan News : कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरात मोठ्या अनधिकृत चाळी, गाळे उभारले जात आहेत. भूमाफियांनी आरक्षित भूखंड लाटण्याचा सपाटा लावला आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणजवळील टिटवाळा, मांडा, बल्यानी परिसरात आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा (Kalyan) बांधकामे, अनधिकृत चाळी आणि धाबे उभारण्यात आले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने भूमाफियांचे फावले आहे. दरम्यान (KDMC) केडीएमसीच्या उपायुक्तांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. (Latest Marathi News)

कल्याण जवळ असलेल्या (Titwala) टिटवाळा मांडा परिसरात मोठ्या अनधिकृत चाळी, गाळे उभारले जात आहेत. भूमाफियांनी आरक्षित भूखंड लाटण्याचा सपाटा लावला आहे. ही बेकायदा घरे गरीब गरजू नागरिकांच्या माथी मारत राजरोस फसवणूक सुरू आहे. या बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी करून देखील महापालिकेकडून तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ही बांधकामे उभारली जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या अनधिकृत बांधकामामुळे टिटवाळा मांडा हे परिसर बकाल झालेत. याबाबत महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणार असून या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणी कारवाई करण्यात प्रभाग अधिकाऱ्याने कसूर केल्यास प्रभाग अधिकाऱ्यांची चाैकशी करणार असल्याचे सांगितले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत चर्चा अजूनही सुरू

कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना धक्का! २० वर्षे शिवसेनेशी निष्ठा असलेला कार्यकर्ता म्हणतो, माझी हकालपट्टी करा!

Pune : मोठी बातमी! पुण्यात ठाकरेसेना आणि काँग्रेसची युती, कोण किती जागा लढवणार?

Carrot rasmalai recipe: गाजराचा हलवा खाऊन कंटाळलात; घरच्या घरी बनवा गाजराची रस्मलाई

BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती

SCROLL FOR NEXT