Surabhi Jayashree Jagdish
थंडीच्या दिवसात घरात गाजराचा हलवा नक्कीच बनतो. पण तुम्ही कधी गाजराची रस्मलाई करून पाहिली आहे का?
हे बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्या. त्या नंतर एका पॅनमध्ये थोडेसं तूप गरम करून त्यात किसलेलं गाजर घाला. ते ४ ते ५ मिनिटे परतून घ्या.
आता गाजर मऊ झाले की त्यात थोडे दूध घाला. आणि ते पीठासारखं होईपर्यंत शिजवा. यामुळे गाजराला योग्य टेक्स्चर मिळतं.
नंतर एका खोल भांड्यात १ लिटर दूध गरम करा. दुधाचं प्रमाण अर्ध होईपर्यंत उकळा. यामुळे दूध घट्ट आणि चविष्ट होतं.
आता त्यात वेलची पावडर आणि केशर घाला. त्यानंतर तयार केलेल्या गाजराचे गोळे त्यात टाका. यामुळे गाजराला दुधाचा स्वाद मिळतो.
हे मिश्रण मंद आचेवर २ ते ४ मिनिटे शिजू द्या. त्यामुळे गाजराचे गोळे दुधात पूर्णपणे मुरतात. यामुळे रस्मलाई अधिक स्वादिष्ट होते.
शेवटी गॅस बंद करून वरून चिरलेले बदाम आणि पिस्ते घाला. आता तुमची गाजराची रस्मलाई तयार आहे.