Surabhi Jayashree Jagdish
ब्लाऊज घातल्यानंतर दंड जाड दिसतोय, असं अनेक महिलांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र योग्य रंगांची निवड केली तर दंड अधिक सडपातळ, नीटस आणि एलिगंट दिसू शकतो.
गडद, मॅट आणि योग्य टोनचे रंग डोळ्यांना स्लिम इफेक्ट देतात. तर फार फिकट किंवा चमकदार रंगामुळे दंड जाड दिसू शकतो. स्लिम लूकसाठी कोणत्या रंगाचे ब्लाऊज वापरावेत ते पाहूयात.
काळ्या रंगामुळे दंडाचा आकार लहान दिसतो. स्लीव्हलेस किंवा हाफ स्लीव्ह ब्लाऊजमध्ये काळा रंग विशेष फायदेशीर ठरतो.
नेव्ही ब्ल्यू हा गडद रंग असून काळ्याइतका कडकही वाटत नाही. दंडावर सॉफ्ट आणि स्लिम इफेक्ट देतो, विशेषतः रेशमी साड्यांसोबत तो मॅच होतो.
मॅरून रंग दंडाचा जाडेपणा लपवतो आणि एलिगंट लूक देतो. चमक नसलेला मॅट मॅरून ब्लाऊजमुळे दंड सडपातळ होतो.
डार्क ग्रीन रंग डोळ्यांना शांत वाटतो आणि दंडाची रुंदी कमी भासते. हलका ब्राइट ग्रीन टाळून गडद शेड निवडल्यास फरक स्पष्ट दिसतो.
चारकोल ग्रे हा न्यूट्रल आणि स्लिमिंग टोन आहे. यामध्ये दंड काहीसा स्लिम दिसतो. ऑफिसवेअर किंवा साध्या साड्यांसाठी हा रंग उत्तम मानला जातो.