Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा

हिवाळ्यात मुंबईत थंडीचा हलका स्पर्श जाणवला की, फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. कांदिवली परिसरात राहत असाल तर घराजवळच अशा अनेक ठिकाणं आहेत जिथे हिवाळ्यातील शांत हवा, हिरवळ आणि निवांत वातावरणाचा सुंदर अनुभव मिळतो.

संजय गांधी नॅशनल पार्क

कांदिवलीजवळचे हे सर्वात मोठं आणि लोकप्रिय जंगलविभागातील पर्यटनस्थळ आहे. हिवाळ्यात इथे सायकलिंग आणि निसर्गदर्शन अत्यंत आनंददायी वाटतं.

कान्हेरी लेणी

संजय गांधी उद्यानात असलेल्या या बौद्ध लेणींना हिवाळ्यात पाहण्याचा अनुभव जास्त सुंदर असतो. थंड हवेत डोंगर चढण कमी त्रासदायक असते आणि वरून संपूर्ण जंगलाचा नजारा मोहक दिसतो.

महावीर नगर खाऊ गल्ली

कांदिवलीत महावीर नगरची खाऊ गल्ली फार फेमस आहे. संध्याकाळची लाईट्स आणि स्ट्रीटफूडचा अनुभव विशेष वाटतो. गर्दी असूनही वातावरण उत्साही आणि फ्रेश ठेवणारे असते.

आक्सा बीच

कांदिवलीपासून जवळ असलेला हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा हिवाळ्यात जास्त मनोहारी दिसतो. याठिकाणी गर्दी तुलनेने कमी असल्याने निवांत फिरता येतं.

गोराई बीच

हिवाळ्यात समुद्रकिनारा शोधत असाल तर गोराई उत्कृष्ट पर्याय आहे. शांत, रुंद आणि स्वच्छ किनारा दिवसभराचा आरामदायी अनुभव देतो. जवळचं एसेल वर्ल्ड बंद असलं तरी बीच परिसर आजही आकर्षक आणि शांत आहे.

माईंडस्पेस

कांदिवलीच्या मालाडजवळ असलेलं हे एक ठिकाण आहे. याठिकाणी रिकामी रस्ते असून खाण्यासाठी देखील अनेक ठिकाणं आहेत.

शिंपोली गार्डन

घराजवळच एखादं शांत आणि व्यवस्थित उद्यान हवं असेल तर ही दोन्ही ठिकाणं छान आहेत. हिवाळ्यात इथली थंड हवा, फुलांची बाग आणि शांत वातावरण मनाला रिलॅक्स करतं. कुटुंबासोबत बसायला, चालायला आणि मुलांसाठी खेळायला उत्तम जागा आहे.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा