Nagpur News : मैत्रिणीसोबत हॉटेलात गेलेल्या तरुणाचे धक्कादायक कृत्य; तरुणी घाबरून धावतच आली बाहेर

Nagpur News : दोघेजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी ही बाथरूममध्ये गेली होती. यानंतर रूममध्ये एकटाच असल्याने मुकेशने ओढणीने गळफास
Nagpur News
Nagpur NewsSaam tv

पराग ढोबळे

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसोबत हॉटेलात गेलेल्या (Nagpur) तरुणाने रुममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (Breaking Marathi News)

Nagpur News
Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अपघातात चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली आहे. मुकेश भोंडेकर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मनसर येथे वास्तव्यास होता. मुकेश हा मैत्रीनी सोबत नगरधन येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघेजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी ही बाथरूममध्ये गेली होती. यानंतर रूममध्ये एकटाच असल्याने मुकेशने ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur News
Bhandara Temperature : सूर्य आग ओकतोय; भंडाऱ्याचा पारा ४३ अंशाच्या वर

तरुणी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर मुकेशने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृष्य पाहून घाबरलेली तरुणी रूममधून धावत बाहेर आली व घटनेबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस (Police) आल्यावर मुकेशला खाली उतरवत तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस सगळ्या प्रकरणांमध्ये मुलीकडून घटनाक्रम जाणून घेतला. दरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट झालं नसून नेमकं काय घडलं; याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होईल. त्याशिवाय पोलिसही या सगळ्या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com