Arun Gawli : डॉन अरुण गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होणार?

Arun Gawli latest news : डॉन अरुण गवळीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली आहे.
Arun Gawli
Arun Gawli Saam tv

पराग ढोबळे, नागपूर

Arun Gawli Latest News :

डॉन अरुण गवळीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अरुण गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र, गृह विभाग यावर काय हरकत घेणार याकडे लक्ष असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिले आहे. २००६ च्या एका शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती.

अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने गवळीला मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासन आणि गृहविभागाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.

Arun Gawli
Kolhapur Crime News : कोल्हापुरात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, गुंडाची टोळक्याकडून निर्घृण हत्या; VIDEO व्हायरल

काय आहे गवळीचे प्रकरण?

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

२००६ सालच्या राज्य सरकारच्या परिपत्रकात काय म्हटलंय?

>> जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना १४ वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, त्याचबरोबर ६५ पेक्षा जास्त वय असल्यावर तुरुंगात सोडता येईल.

>> गवळीचा जन्म १९५५ सालचा असल्याने त्याचे वय सध्या ७० वर्ष आहे.

>> नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळी २००७ पासून तुरंगात आहे. गवळी गेल्या सोळा वर्ष तुरुंगात आहे.

Arun Gawli
Shirpur Crime News : बहिणीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

>> २००६ च्या राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करत आहे.

>> त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com