Kolhapur Crime News: कोल्हापुरात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, गुंडाची टोळक्याकडून निर्घृण हत्या; VIDEO व्हायरल

Rankala's Kolhapur News: अजय दगडू शिंदे याची पाठलाग करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रंकाळा परिसरात ही हत्येची घटना घडली होती.
Gangster Killed by another gang in rankala kolhapur police
Kolhapur Crime NewsSaam TV

रणजीत माजगावकर | कोल्हापूर

Kolhapur Crime News :

कोल्हापूर काल हत्येच्या एका घटनेने हादरलं. मुळशी पटर्न सिनेमातील सीनप्रमाणे एका गुंडाची दुसऱ्या गुंडांच्या टोळीने दिवसाढवळ्या भररस्त्यात हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

हत्येच्या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Gangster Killed by another gang in rankala kolhapur police
Sangli : कत्तलीसाठी नेणाऱ्या ४१ गोवंशाची सुटका; ४२ लाखांहून अधिक मुद्देमाल इस्लामपूर पोलिसांकडून जप्त

अजय दगडू शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. गुरुवारी रंकाळा परिसरात ही हत्येची घटना घडली होती. गुंडांच्या टोळक्याने अजयचा पाठलाग करुन एका ठिकाणी त्याला गाठलं. तिथे पाच जणांनी अजयवर कोयते आणि एडक्यांनी सशस्त्र हल्ला चढवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gangster Killed by another gang in rankala kolhapur police
Arun Gawli : डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व तुरुंगातून सुटका होणार?

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच ते सहा कोयते आणि एडके जप्त केले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमन्यासातून ही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोल्हापुरात वाढलेल्या गुन्ह्यांचे मूळ गांजा, भाजप नगरसेवकाचा आरोप

कोल्हापुरात वाढलेल्या गुन्ह्यांचे मूळ गांजा असून शहर परिसरात गांजा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. अनेक टोळ्या या गांजाच्या आहारी पडल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावे अन्यथा कोल्हापूरची परिस्थिती आणखी बिघडेल. तर कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून यांच्या दुर्लक्षामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अवैद्य धंदे, गुंडगिरी आणि गांजा विक्रीचे प्रमाण वाढल्याचेही सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com