Shirpur Crime News : बहिणीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Dhule Shirpur : वाघाडी गावाकडे नेत शिंगावे फाट्याच्या कोपऱ्यावर बेदम मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून संशयित फरार झाले.
Shirpur Crime News
Shirpur Crime NewsShirpur Crime News

शिरपूर (धुळे) : तरुणाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याच्या संशयावरून त्याच्या भावाला घरातून ओढून नेत (Dhule) जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संशयावरून दोन जणांविरोधात शहर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना १ एप्रिलला सायंकाळी घडली. (Maharashtra News)

Shirpur Crime News
Wheat Bogus Seeds : बोगस बियाणांमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; लागवड केलेल्या गव्हाची वाढ खुंटली

शिरपूर (Shirpur) शहरातील जनतानगर येथील किशोर विजय तांबट (वय २४) याने याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ अक्षय याने बहिणीस पळवून नेल्याच्या संशयावरून पवन शंकर हटकर व सचिन शंकर हटकर (दोघे रा. जनतानगर) त्याच्या घरी गेले. ‘तुझ्या भावाने आमच्या बहिणीला पळवून नेले असून, जोवर ती परत येत नाही, तोवर आम्ही कोणालाच जिवंत सोडणार नाही’ (Crime News) अशी धमकी देऊन त्यांनी बेदम मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur Crime News
Manmad Bajar Samiti : मनमाड बाजार समिती बंद; हमाली, तोलाई, भराई कपात संदर्भाचा निर्णय लांबला

पवनला लोखंडी जिन्यावरून खाली फरफटत नेत दुचाकीवर बसविले. त्याला वाघाडी गावाकडे नेत शिंगावे फाट्याच्या कोपऱ्यावर बेदम मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून संशयित फरार झाले. संशयितांविरोधात (Shirpur Police) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संदीप दरवडे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com