Manmad Bajar Samiti : मनमाड बाजार समिती बंद; हमाली, तोलाई, भराई कपात संदर्भाचा निर्णय लांबला

Manmad News : नो वर्क नो वजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात व्यापारी व हमाल- मापाडी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.
Manmad Bajar Samiti
Manmad Bajar SamitiManmad Bajar Samiti

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, भराई कपात संदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे हमाल- मापाडी यांनी काम बंद पुकारले आहे. परिणामी (Manmad) मनमाड बाजार समिती बंद राहणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. (Tajya Batmya)

Manmad Bajar Samiti
Buldhana News : मिरवणुकीतून घरी येत खोलीत जात उचलले टोकाचे पाऊल

नो वर्क नो वजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी; अशी मागणी (farmer) शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात व्यापारी व हमाल- मापाडी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. मात्र त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बाजार समितीत (Bajar Samiti) लिलाव प्रक्रियेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये; यासाठी पुढील आदेशापर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manmad Bajar Samiti
Wheat Bogus Seeds : बोगस बियाणांमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; लागवड केलेल्या गव्हाची वाढ खुंटली

कांदा लिलाव राहणार बंद 

व्यापारी वर्ग व हमाल- मापाडी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने हमाल- मापाडी यांनी बाजार समितीला पत्र देत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत आजपासून मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com