BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती

Rakhi Jadhav Join BJP: मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्या राखी जाधव यांनी पक्षाची साथ सोडत आज भाजपमध्ये प्रवेश केला. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राखी जाधव यांनी भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती
NCP Leader Sharad Pawarsaam tv
Published On

Summary:

  • ऐन महापालिका निवडणुकीत मुंबईत शरद पवार गटाला मोठा धक्का

  • राखी जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला

  • भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

  • घाटकोपरमधून भाजपकडून राखी जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याने शरद पवारांची साथ सोडली. राखी जाधव यांनी ऐन निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. जागा वाटपावरून राखी जाधव नाराज होत्या. त्यांनी भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त ५ ते १० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव नाराज झाल्या होत्या. कमी जागा मिळाल्यामुळे राखी जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे त्या पक्षाची साथ सोडणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती
BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?

राखी जाधव यांनी आज भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. घाटकोपरमधील राखी जाधव यांच्या वॉर्डमधून त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राखी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीसोबत आहेत. मुंबईमध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा किल्ला लढवत आल्या आहेत.

मुंबईत पक्ष मोठा करण्यात राखी जाधव यांचा मोठा हात आहे. पक्षाची बांधणी करण्यापासून आंदोलनं, महत्वाचे निर्णय घेणे अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या होत्या. आता त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती
BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नव्या आघाडीची रणनीती काय?

दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेले असून हे सर्व उमेदवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मुंबईमध्ये भाजप १२८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून बीएमसीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती
BJP Candidates List: BMC साठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू निवडणुकीच्या रिंगणात; यादीत कोण-कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com