BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?

Shivsena Thackeray Group Candidates List: मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ४५ उमेदवारांची ही यादी असून या सर्वांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?
Uddhav thackeray Saam tv
Published On

Summary -

  • ठाकरेसेनेकडून बीएमसीसाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

  • मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

  • अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलांना उमेदवारी

  • उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरेसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाने अनेक दिग्गजांना संधी दिली आहे. रविवारी रात्रभर मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: उमेदवारांची भेट घेत त्यांना एबी फॉर्म दिला. हे सर्व उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

शिवसेना ठाकरे गटाने ४५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. उर्वरीत उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात येतील. ठाकरे गटाकडून ९० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. आज उर्वरीत उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?
मोठी बातमी! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

माजी खासदार आणि पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याला वॉर्ड क्रमांक 89 मधून उमेदवारी मिळाली आहे. आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार हारून खान यांची मुलगी सबा हारून खान हिला वॉर्ड क्रमांक 64 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर हिला वॉर्ड क्रमांक 150 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?
BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शिवसेना ठाकरेसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी -

१) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे

२) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड

३) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर

४) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे

५) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील

६) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर

७) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार

८) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू

९) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे

१०) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे

११) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने

१२) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत

१३) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी

१४) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर

१५) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान

१६) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे

१७) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत

१८) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे

१९) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री

२०) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर

२१) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे

२२) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत

२३) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर

२४) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव

२५) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे

२६) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे

२७) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख

२८) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील

२९) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर

३०) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे

३१) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे

३२) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे

३३) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे

३४) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर

३५) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर

३६) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले

३७) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके

३८) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे

३९) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड

४०) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ

४१) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे

४२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ

४३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर

४४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर

४५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?
BJP Candidates List: BMC साठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू निवडणुकीच्या रिंगणात; यादीत कोण-कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com