कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना धक्का! २० वर्षे शिवसेनेशी निष्ठा असलेला कार्यकर्ता म्हणतो, माझी हकालपट्टी करा!

Kalyan Dombivli Election : ऐन निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीनामा सत्र सुरूच आहे. पालिकेतील माजी सभागृह नेता आणि उपशहर प्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीसत्र
Kalyan Dombivli Elections Shivsena Shinde Groupsaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर दुसरीकडं शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजीचा सूर अत्यंत 'कर्कश्श' झाला असून, राजीनामा सत्र सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होईल, असा कयास लावला जात आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याचं कळतं. त्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत जेवढ्या जागा वाट्याला येतील, त्यावर समाधान मानावे, असे आवाहन वरिष्ठांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर भाजपच्या स्थानिक नेते-पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. दुसरीकडं शिवसेना शिंदे गटामध्येही नाराजीतून राजीनामा सत्र सुरू आहे.

माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेता कैलास लखा शिंदे आणि कल्याण ग्रामीणतील मनोज गणपत चौधरी यांनी उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे कैलास लखा शिंदे यांनी थेट माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आज राजकारणात निष्ठा नाही, आर्थिक क्षमता हाच निकष आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पक्षासाठी माझा त्याग, असे पत्रात नमूद केले आहे.

आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांना कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा 'आर्थिक सक्षम' हा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यास पात्र नाही. माझ्यामुळं पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीसत्र
BMC Election: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती

दुसरीकडे, कल्याण ग्रामीणतील मनोज गणपत चौधरी यांनी उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळं किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून, मी पदाचा त्याग करत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती चौधरी यांनी केली आहे. शिंदे गटातील नाराजी आणि राजीनामा सत्रामुळं पक्षांतर्गत अस्वस्थता उघड झाल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीसत्र
Pune : मोठी बातमी! पुण्यात ठाकरेसेना आणि काँग्रेसची युती, कोण किती जागा लढवणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com