cricketer dies during match Saam TV News
महाराष्ट्र

Heart Attack News: क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू, हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी काय करावे? डॉक्टर म्हणाले...

Jalna Cricketer Died Due To Heart Attack:

Priya More

जालन्यात क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृदविकाराचा झटका येऊ नये यासाठी काय करावे याबाबत डॉक्टरांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तरुणांसोबत सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूपच गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

जालन्यातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.रामेश्वर सानप यांनी सांगितले की, 'खेळताना हृदयावरती ताण येऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या हृदयमध्ये ब्लॉकेज असतील अशा व्यक्तीने क्रिकेट खेळणे किंवा खूप एक्झरशन होणारे काम केले तर अशा व्यक्तींना हृदयविकाराचा झटका लवकर येऊन मृत्यू होऊ शकतो.'

तसंच, 'तुम्हाला दम लागत असेल, छातीत दुखत असेल असा त्रास होत असल्यावर एक्झरशन टाळले पाहिजे. प्रॅक्टिस नसताना खूप एक्झरशन केल्यावर हृदयावर ताण येऊन हा प्रसंग येऊ शकतो. तसेच वेळेत म्हणजेच लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे आवश्यक आहे.', असे देखील डॉ. रामेश्वर सानप यांनी सांगितले.

जालन्यात आज क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजय पटेल असं मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. विजय पटेल हा तरुण मुंबईनजीकच्या नालासोपारा येथे राहत होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रॉफी सामन्यांमध्ये विजय पटेल हा खेळाडू खेळत असताना याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकृत माहिती आली नसली तरी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT