ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या थंडीत घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
अलीकडे कोणत्याही वयात हृदयरोग होऊ शकतो. त्यामुळे थंडीमध्ये सर्वच वयोगटातील लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
सकाळी लवकर आणि रात्री उशिरा बाहेर पडताना गरम कपडे घालावेत.
हात आणि पायांना गरम कपड्यांनी झाका. त्याने शरीर उबदार राहील.
नियमित व्यायाम करावा तसेच खाण्यापिण्याचं पिण्याची पथ्य पाळणे आवश्यक आहे.
थंडीत शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित पावतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही थंडीमध्ये जास्त असते. हा झटका कोणत्याही वयात येतो.
थंडीमध्ये विशेषता पहाटेच्या वेळी तीन ते सहा या दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते त्याची शक्यता जास्त असते.