Heart Attack Signs: शरीरात होऊ लागले 'असे' बदल तर वेळीच व्हा सावध; हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात

Heart Attack Signs: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात, ज्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं.
Heart Attack Signs
Heart Attack SignsSaam tv
Published On

हृदयाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. हृदयाची योग्य काळजी घेतली नाही तर हृदयाचा झटका येण्याचा धोका असतो. हार्ट अटॅक जीवघेणा असून शकतो. मुळात चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहार यामुळे या समस्येचा धोका बळावतो.

दरम्यान हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुम्हाला तुमचं शरीर संकेत देतं. जर तुम्ही वेळीच सुरुवातीची लक्षणं समजून घेतली तर हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात, ज्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर कोणत्या प्रकारचे सिग्नल देतं हे जाणून घेऊया.

पटकन थकवा येणं

काम केल्यानंतर थकवा जाणवणं सामान्य गोष्ट आहे. मात्र जर तुम्हाला अचानक जास्त घाम येण्यास सुरुवात झाली आणि थकवा वाटत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. वारंवार थकवा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

Heart Attack Signs
Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

पचनक्रिया संथ होणं

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्यावेळी तुमचं हृदय योग्य पद्धतीने कार्य करत नाही किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही आजार होतो तेव्हा पचनसंस्था बिघडू लागते. अशावेळी तुमच्या अन्नाच्या पचनाता वेग काहीसा संथ होतो. आहार आणि जीवनशैली असूनही पचनाशी संबंधित समस्या असल्यास ते हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं.

Heart Attack Signs
महिनाभर चिया सिड्स खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

अधिक प्रमाणात घाम येणं

जास्त घाम येणं हे देखील शरीरातील अनेक आजारांचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे कधीही असा त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच जास्त घाम येणं यासारखी लक्षणं दिसू येतात. जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Attack Signs
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

श्वास घेण्यात बदल होणं

श्वासासंबंधी समस्या उद्भवणं हे देखील हार्ट अटॅकचं लक्षण मानलं जातं. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा श्वास घेण्यास त्रास होण्याच्या समस्या उद्भवतात. श्वासोच्छवासात अचानक बदल होत असल्यास डॉक्टरांना भेटून घ्या.

Heart Attack Signs
मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com