मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Brain Blockage Symptoms : आपल्या शरीरात कोणतीही समस्या उद्भवत असेल तर काही प्रकारची लक्षणं दिसून येतात. असंच मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी कोणती लक्षणं दिसून येतात, हे पाहूयात.
Brain Blockage Symptoms
Brain Blockage Symptomsyandex
Published On

मेंदू हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. मेंदूच्या सहकार्याने आपली दैनंदिन काम योग्यरित्या होण्यास मदत होते. अशावेळी जर मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

अनेकदा मेंदूतील नसा ब्लॉकेज होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे मेंदूचं कार्य सुरळीत होऊ शकत नाही. ज्यावेळी मेंदूच्या नसा ब्लॉक होतात तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. मेंदूच्या नसा ब्लॉक झाल्यावर नेमकी कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

तीव्र डोकेदुखी

मेंदूच्या नसा ब्लॉक झाल्यामुळे रुग्णांना तीव्र किंवा मध्यम डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. हे लक्षण नसा ब्लॉक होण्याच्या काही दिवस आधी दिसू शकतात. जर मेंदूतील नसा ब्लॉक झाल्या असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

शरीराची एक बाजू सून्न होणं

शरीराच्या एका भागात सून्नपणा येणं किंवा मुंग्या येणं हे देखील मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा येत असल्याचं लक्षण मानलं जातं. मुख्य म्हणजे अनेकजण या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात. तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.

बोलण्यामध्ये अस्पष्टता

मेंदूच्या नसा ब्लॉक होण्याच्या काही दिवसांपूर्वी मेंदूतील रक्तप्रवाह मंद होण्यास सुरुवात होते. यामुळे मेंदूचं कार्यही मंदावतं. अशा परिस्थितीत रुग्णांना बोलण्यामध्ये खूप त्रास होऊ लागतो.

मळमळ आणि उल्टी

मेंदूच्या नसा ब्लॉक होण्याच्या समस्येत मळमळ आणि उलटी होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे सतत तुम्हाला हा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

Brain Blockage Symptoms
Pani Puri : पोट बिघडण्याची चिंता होईल दूर; घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी, जिभेवर चव रेंगाळत राहील

नजर धुसर होणं

मेंदूतील नसा ब्लॉक होण्याच्या काही दिवसांपूर्वी रूग्णाची नजर धूसर होण्याची शक्यता असते. मात्र या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. हे खूप गंभीर असू शकते. जर तुमची दृष्टी धूसर होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

एकाग्रतेचा अभाव जाणवणं

मेंदूतील नसा ब्लॉक होत असल्यास रुग्णांना कोणत्याही कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यात खूप त्रास होतो. कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना त्यांना चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com