पाणीपुरी फक्त नाव ऐकताच कित्येक लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. महिलावर्ग तर पाणीपुरीचा फॅन आहे. आंबट,गोड, तिखट पाणीपुरी खाऊन मन अगदी तृप्त होते. त्यामुळे अनेक लोक बाहेर पाणीपुरी (Pani Puri ) खातात. मात्र बाहेरची भेसळयुक्त खराब पाणी पुरी आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पाणीपुरी बाहेर खाणे टाळा. कारण यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवतात.
आपण सध्या पाणीपुरीच्या भेसळीबाबत किंवा खराब पाण्यासंबंधित रोज काहीना काही ऐकत असतो. ज्यामुळे बाहेरच्या पाणीपुरीवरून आपली वासना उडाली आहे. मात्र पाणीपुरीची गोडी आवरणे कठीण असते. कारण आपल्याला केव्हा ही आणि कधी ही पाणीपुरी खाण्याचे क्रेव्हिंग होत असते. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घरीच सिंपल पद्धतीने चटपटीत पाणीपुरी बनवा.
पाणीपुरी साहित्य
पाणीपुरीची पुरी : रवा, मैदा, मीठ, तेल, पाणी
पाणीपुरीचा मसाला : बटाटे, पांढरे वाटाणे, कांदा, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, चाट मसाला, मीठ
पाणीपुरीचे पाणी : दही, चिंच, खारी बूंदी, चाट मसाला, जलजीरा, कोथिंबीर, पुदिना, मीठ, काळी मिरी पावडर
पाणीपुरीची पुरी
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा, मैदा, मीठ,तेल घालून छान कणीक मळून घ्या. नकाही मिनिटे हे पीठ ओला कपड्यामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कणकेचे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. गोलाकार येण्यासाठी तुम्ही वाटीचा वापर करू शकता. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पुऱ्या खरपूस, फुगेपर्यंत तळून घ्या. पुऱ्या तळताना दाबा म्हणजे त्या छान फुगतील.
पाणीपुरीचा मसाला
पाणीपुरीचा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम पांढरे वाटाणे आणि बटाटा उकडायला ठेवा. बटाटे थंड झाल्यावर सालं काढून एका बाऊलमध्ये चांगले मॅश करून घ्या. आता यात बारीक चिरलेला कांदा आणी हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणात काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान ढवळून घ्या. अशाप्रकारे पाणीपुरीचा मसाला तयार झाला आहे.
पाणीपुरीचे पाणी
तिखटपाणी बनवण्यासाठी मिक्सरला पुदिना, आलं, साखर, पाणीपुरी मसाला, जलजीरा आणि कोथिंबीर टाकून छान मिक्सला वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट एक बाऊलमध्ये काढून त्यात थंडपाणी टाका. अशाप्रकारे पाणीपुरीचे मसाले पाणी तयार झाले. यात तुम्ही चवीसाठी खारी बुंदी देखील घाला. तसचे गोड पाणी बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरला दही, चिंच, खजूर , साखर वाटून घ्या आणि पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये पाणी टाका. पाणीपुरीचे गोड पाणी तयार झाले.
आता पुरी हलकी फोडून त्यात पाणीपुरीचा मसाला घाला आणि तुमच्या आवडीनुसार पाणीपुरीच्या पाण्यात पुरी बुडवून चटपटीत पाणी पुरीचा आस्वाद घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.