Punipuri Video: पाणीपुरी खाताय की अळीपुरी? पाणीपुरीत आढळल्या जीवंत अळ्या,लातूरमधील व्हिडिओ व्हायरल

Punipuri Video Viral : तुम्ही पाणीपुरी खाताय की अळीपूरी, कारण पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमका कुठं घडलाय हा किळसवाणा प्रकार? कुठे सुरूय तुमच्या आरोग्याशी खेळ? यावरचा हा खास रिपोर्ट.
Punipuri: पाणीपुरी खाताय की अळीपुरी? पाणीपुरीत आढळल्या जीवंत अळ्या,लातूरमधील व्हिडिओ व्हायरल
Punipuri Video Viral
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अनेकजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी पाणीपुरी खात असतात. मात्र हिच पाणीपुरी तुमच्या जीवावर उठू शकते. कारण पाणीपुरीच्या पाण्यात चक्क जीवंत अळ्या पोहत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय...त्यामुळे खवय्यांमध्ये एकच खळबळ उडालीय.

हा व्हिडीओ पाहा... लातूरमधील गांधी चौकातल्या एका स्वीट होममधील पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या पोहत असल्याचं धक्क्दायक चित्र समोर आलंय. एका ग्राहकानंच हा संतापजनक प्रकार उघडकीस आणलाय...पाणीपुरीसोबत देण्यात आलेल्या पाण्यात ही जीवंत अळी निघाली आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ्याचं बिंग फुटलं. .मात्र हा ग्राहक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पाणीपुरीचं पाणी बनवत असलेलं ठिकाण आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं. हे जर तुम्ही पाहिलं तर पाणीपुरी खाताना तुम्ही 10 वेळा विचार कराल.

ही दृश्यं पाहा. झुरळांचा असलेला वावर, पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारं डर्टी पाणी.. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरुय...हा प्रकार फक्त लातूरपुरता मर्यादित नाही तर याआधी पाणीपुरीत लघवी मिसळल्याचा, पाणीपुरीच्या पाण्यात अॅसिड मिसळल्याचा, पाणीपुरीचं पीठ पाण्याने मळल्याचे संतापजनक प्रकार समोर आलेत.

पाणीपुरीच्या ठेल्याकडे खवय्यांची पावलं वळतात. मात्र खवय्यांनी जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालू नये. मात्र अशा डर्टी पाणीपुरीवाल्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.

Punipuri: पाणीपुरी खाताय की अळीपुरी? पाणीपुरीत आढळल्या जीवंत अळ्या,लातूरमधील व्हिडिओ व्हायरल
Pani Puri and Cancer: खळबळजनक! पाणीपुरी खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? काय आहे व्हायरल VIDEO मागचं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com