Bhandara News : तरुणाने तयार केले इमर्जेंसी मोबाईल ॲप; अपघात होताच कुटुंबियांना मिळणार तात्काळ माहिती

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील एका तरुणाने एमर्जेंसी हेल्प मोबाईल ॲप तयार केले आहे. अपघात होताच आपलं मोबाईल लॉक असतो मग आपल्या संदर्भात लोकांना माहिती मिळत नाही.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: अनेकदा अपघात झाल्यानंतर संबंधितांची माहिती मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांशी देखील संपर्क लवकर होऊ शकत नाही. मात्र यावर एक पर्याय म्हणून भंडारा जिल्ह्यातील तरुणाने एक इमर्जेंसी मोबाईल ॲप तयार केले आहे. या अँपच्या माध्यमातून अपघात होताच दुचाकीवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर घरच्या लोकांना तात्काळ माहिती मिळू शकते.

Bhandara News
Nandurbar News : तीन वर्षापासून ठिबक सिंचन संचांवरील अनुदान नाही; नंदुरबारमध्ये शेतकरी आक्रमक

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या वरठी येथील अभय नामक तरुणाने एमर्जेंसी हेल्प मोबाईल ॲप तयार केले आहे. अपघात होताच आपलं मोबाईल लॉक असतो मग आपल्या संदर्भात लोकांना माहिती मिळत नाही. त्यासाठी एक क्यूआर कोड आपल्या दुचाकीला लागला असला तर या ॲपमध्ये ज्या व्यक्तीचा नंबर ठेवला असेल; अशा व्यक्तीला तात्काळ अलर्ट मिळेल. त्यामुळे घरच्या लोकांना तत्काळ माहिती मिळताच आपण गूगल मॅपच्या सहाय्याने (Accident) अपघातस्थळीचा लोकेशन मिळूं शकते. 

Bhandara News
Chalisgaon Accident : आजोबांसोबत गेलेल्या बालकाला कंटेनरने चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको 

तात्काळ मदत मिळण्यास मदत 

अपघात झाल्यानंतर गाडीवर असलेल्या क्यूआर कोंडला स्कॅन करून माहिती मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे अनोळखी व्यक्ती सुध्दा या क्यूआर कोडच्या माध्यमांतून अपघात झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकते. यामुळे त्यास तात्काळ मदत मिळण्यास मदत होऊ शकते. मुख्य म्हणजे हे ॲप देशातील पाहिलं आप असुन नागरीकांना याची मदत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com