Leftover Roti Recipe : चटपटीत चव अन् खायला पौष्टिक, उरलेल्या चपातीपासून नाश्त्याला बनवा टेस्टी डीश

Dahi Chapati Chaat : सकाळच्या नाश्त्याला उरलेल्या चपातीपासून झटपट दही चपाती चाट बनवा. लहान मुलं बोटं चाखत राहतील. सिंपल रेसिपी नोट करा.
 Dahi Chapati Chaat
Leftover Roti RecipeSAAM TV
Published On

प्रत्येक घरात रोज २ ते ३ रात्रीच्या चपात्या उरतात. या चपात्या आपण सकाळी गरम करून खातो. पण या उरलेल्या चपात्यांपासून सकाळच्या नाश्त्याला चटपटीत पदार्थ होऊ शकतो. यामुळे तुमचा नाश्ता बनवण्याचा वेळ वाचेल आणि उरलेली चपाती खाल्ली देखील जाईल. तसेच जिभेला सकाळी सकाळी नवीन चांगली चव देखील चाखता येईल.

आपण नेहमीच उरलेल्या चपातीपासून चिवडा बनवत आलो आहोत, मात्र यावेळी आपण दही चपाती चाट बनवणार आहोत. ही रेसिपी खायला टेस्टी लागते. मुलं आवडीने याचा आस्वाद घेतील. तसेच यामुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते.

दही चपाती चाट

साहित्य

  • चपाती

  • दही

  • साखर

  • लाल तिखट

  • कांदा

  • हिरवी मिरची.

  • हिंग

  • जिरे पावडर

  • कसुरी मेथी

  • कोथिंबीर

  • लाल तिखट

  • पुदिन्याची चटणी

 Dahi Chapati Chaat
Leftover Rice Recipe : काय सांगता! भातापासून तयार केलं थालीपीठ; वाचा टेस्टी रेसिपी

कृती

सकाळच्या नाश्त्याला दही चपाती चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम चपाती दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. चपाती कडक झाल्यावर एका बाऊलमध्ये ती कुस्करून घ्या. आता दुसऱ्या बाऊलमध्ये दही घेऊन छान फेटा. या दह्यामध्ये साखर आणि पाणी घालून चांगले मिक्स करा. आता या मिश्रणात कुस्करलेली चपाती घाला. यानंतर यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, हिंग, जिरे पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, लाल तिखट, पुदिन्याची चटणी घालून छान मिक्स करून घ्या. शेवटी चपाती चाट प्लेटमध्ये सर्व्ह करताना त्यावर लाल तिखट आणि हिरवी चटणी पसरवा. चपाती चटपटीत दही चाट तयार झाला.

 Dahi Chapati Chaat
Krishna Janmashtami 2024: गोकुळाष्टमीला राशीनुसार कन्हैयाला 'हा' भोग लावा अन् मनोभावे आराधना करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com