Health Tips : कोणते कॉम्बिनेशन आरोग्यासाठी बेस्ट, दही-साखर की दही-मीठ? वाचा तज्ज्ञांचे मत

Curd with Sugar vs Curd with Salt : बहुतेक लोक दही-साखर आणि दही-मीठ एकत्र करून खातात. पण या दोघांपैकी कोणते कॉम्बिनेशन आरोग्यासाठी बेस्ट आहे आज जाणून घेऊयात.
Curd with Sugar vs Curd with Salt
Health TipsSAAM TV
Published On

अनेक लोकांना दही खायला खूप आवडते. दहीमुळे पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे काही लोक दह्यामध्ये साखर घालून खातात तर काही लोक दह्यामध्ये मीठ घालून खाणे पसंत करतात. दही कॅल्शियम आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. चला तर मग जाणून घेऊयात दही-साखर की दही-मीठ? कोणते कॉम्बिनेशन आरोग्यासाठी बेस्ट आहे.

मीठ-दही

तज्ज्ञांचे मत, दहीमध्ये जास्त मीठ मिसळून खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. उदा. वात,कफ. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास त्यांनी चुकूनही दहीमध्ये मीठ घालून खाऊ नये. यामुळे ब्लड प्रेशर वाढून हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. मीठामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात. दह्यामध्ये मीठ टाकल्यास गुड बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच हायपरटेंशनची समस्या उद्भवते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दह्यांमध्ये मीठ टाकून खाणे फायदेशीर आहे. कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

साखर- दही

दह्यामध्ये साखर घालून अनेक लोक खातात. बहुतेकांचे ते आवडता पदार्थ आहे. मात्र दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर- दही खाणे आरोग्यास घातक ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच पोटाची जळजळ आणि ॲसिडीटीची समस्या दूर होते. दही आणि साखर पोटाची पचनक्रिया सुधारते.साखरेमुळे दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होत नाही.

Curd with Sugar vs Curd with Salt
Pav Bhaji Without Tomato : टोमॅटो महागले, तरी पावसाळ्यात बनवा चटपटीत पावभाजी! वापरा 'ही' भन्नाट युक्ती

कोणते कॉम्बिनेशन आरोग्यासाठी बेस्ट?

दह्यामध्ये मर्यादित प्रमाणात मीठ आणि साखर टाकून खाल्ल्याने दोन्ही पदार्थ आरोग्यास चांगले आहेत. मात्र मधुमेह, ब्लड प्रेशर आणि वजनाची समस्या असलेल्या लोकांनी हे दोन्ही कॉम्बिनेशन खाणे टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे. तसेच तज्ज्ञांचे मत सर्वात बेस्ट म्हणजे दह्यामध्ये कोणताही पदार्थ न टाकता त्याचे सेवन करावे. सामान्य तापमानावर दही खाणे कधीही उत्तम राहते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Curd with Sugar vs Curd with Salt
Shravan 2024 : श्रावणातील उपवासाला 'हा' फलाहार करा, थकवा अन् ॲसिडीटी होईल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com