FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांसाठी FSSAI चा नवा नियम; कंपन्यांना BOLD अक्षरात सांगावं लागेल मीठ, साखर आणि फॅट्सचं प्रमाण

FSSAI News : ग्राहकांना एखादा पदार्थ घेताना त्याच्या पॅकेटवरूनच सर्व माहिती व्यवस्थित मिळावी आणि कोणता पदार्थ त्यांच्यासाठी योग्य आहे हे समजावे, असा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
FSSAI News
FSSAI New RulesSaam TV
Published On

खाद्य पदार्थांसाठी FSSAI कडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पॅकबंद असलेल्या पदार्थांच्या पाकिटांवर त्या पदार्थात असलेलं मीठ, साखर आणि फायबर्स याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. FSSAI कडून शनिवारी या नियमाला मंजूरी देण्यात आली आहे.

FSSAI News
Kriti Sanon Launch Production House: ‘आदिपुरूष’नंतर क्रितीची नवी भूमिका, क्रितीच्या नव्या प्रोडक्शन हाऊससोबत सुशांतचा नेमका काय संबंध?

शनिवारी एफएसएसआयचे अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या अध्यतेखाली खाद्य प्राधिकरणाची ४४ वी बैठक पार पडली. या बैठकीत लेबलींग आणि जाहिरातीमध्ये पदार्थाच्या सुरक्षेबाबतची माहिती बोल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना एखादा पदार्थ घेताना त्याच्या पॅकेटवरूनच सर्व माहिती व्यवस्थित मिळावी आणि कोणता पदार्थ त्यांच्यासाठी योग्य आहे हे समजावे, असा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

मोठ्या अक्षरांत माहिती द्यावी लागणार

कंपन्यांना प्रोडक्टमध्ये असलेल्या साहित्याच्या प्रमाणाची माहिती मोठ्या अक्षरांत द्यावी लागेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये मीठ, साखर, सोडीअम आणि फायबर यांच्याही प्रमाणाचा समावेश असणार आहे. अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टबाबत खोटी माहिती देतात ज्याने ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे FSSAI कडून यावर सातत्याने विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

पॅकफूड आरोग्यासाठी घातक

मार्केटमध्ये विविध पद्धतीचे पॅकफूड उपलब्ध असतात. त्यातील काही फूड आरोग्यासाठी पोषक असल्याचं सांगितलं जातं. प्रत्येक कंपनी आपल्या प्रोडक्टबाबत चांगली जाहिरात आणि दावे करतात. त्यामुळे पॅकफूड घेताना त्यावरील सूचना पूर्ण वाचून घेतली पाहिजे.

काही प्रोडक्टमध्ये १०० टक्के फळांचा रस, १०० टक्के गव्हाचे पीठ अशी जाहिरात आणि दावा केला जातो. मात्र FSSAI कडून असा दावा करण्यावर सुद्धा अक्षेप घेण्यात आला आहे. तुमच्या पदार्थात त्या ठरावीक फळाचा आणि धान्याचा किती टक्के वापर करण्यात आलाय, याची माहिती मोठ्या अक्षरात लिहिण्यास सांगण्यात आलं आहे.

FSSAI News
Dairy Products Side Effects : दररोज दूध, दही आणि पनीरचं सेवन करताय? खाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com