Krishna Janmashtami 2024: गोकुळाष्टमीला राशीनुसार कन्हैयाला 'हा' भोग लावा अन् मनोभावे आराधना करा
कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट २०२४ रोजी जगभर साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी कृष्णभक्त उपवास करून व्रत करतात. तुम्हाला ही कृष्ण भगवानला खुश करायचे असेल तर, आपल्या राशीनुसार पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवा.
मेष रास
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला लोणी-साखरेचा भोग लावा. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो.
मिथुन रास
मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या लोकांनी बाळकृष्णाला पंचरंगी वस्त्र घालून दहीचा नैवेद्य दाखवा.
कर्क रास
चंद्रदेव हा कर्क राशीचा स्वामी असल्यामुळे केशरयुक्त दूध अर्पण करावे.
सिंह रास
सिंह राशीचा लोकांनी श्रीकृष्णाला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून लोणी साखरचा नैवेद्य दाखवावा.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनी मेव्याची बर्फीचा कन्हैयाला भोग लावून कृष्ण चालिसाचे पठण करावे. कारण कन्या राशीचा स्वामी बुध आहे.
तूळ रास
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी असल्यामुळे श्रीकृष्णाला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून लोणीचा नैवेद्य दाखवा.
वृश्चिक रास
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी कृष्णाला पंचामृताने अभिषेक करा आणि मावा, लोणी अर्पण करा.
धनु रास
बृहस्पती हा धनु राशीचा स्वामी असल्यामुळे बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
मकर रास
शनिदेव हे श्रीकृष्णाचे आराध्य दैवत असल्यामुळे साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
कुंभ रास
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कुंभ राशीच्या भाविकांनी पंचामृत आणि माव्याचा मिठाईचा भोग लावा. तसेच शनीदेव कुंभ राशीचे स्वामी आहेत.
मीन रास
मीन राशीच्या लोकांनी कृष्णाला पितांबरी वस्त्रे परिधान करून केशर बर्फीचा नैवेद्य दाखवावा. या राशीचा स्वामी बृहस्पती आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
