Health
HealthSaam Tv

Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

Health News: एका संशोधनातून असं समोर आलंय की, जर तुम्हाला दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय नसेल तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 26% वाढू शकतो.
Published on

आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. शरीराला आराम मिळण्यासाठी झोपेची प्रचंड गरज आहे. झोप ही केवळ शरीराला आराम देण्यासाठी नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम मानली जाते. नुकतंच जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलंय की, जर तुम्हाला दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय नसेल तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 26% वाढू शकतो.

हेल्थलाईनुसार, या संशोधनामध्ये 40 ते 79 वर्षे वयोगटातील 72,000 हून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी संशोधनात असं आढळून आलं आहे की, स्लीप रेग्युलेटरी हा हृदयविकाराच्या जोखमीचा एक प्रमुख घटक आहे. जो झोपेच्या कालावधीपेक्षा अधिक प्रभावी मानला जातो.

Health
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सर होतो? डॉक्टरांनी दिलं तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर!

संशोधन काय सांगतं?

संशोधकांनी स्लीप रेग्युलेरिटी इंडेक्सच्या आधारावर या अभ्यासात समाविष्ट झालेल्या लोकांची तीन समूहांमध्ये विभागणी केली.

  • कमी झोप घेणारे व्यक्ती (SRI >87.3): हृदयविकाराचा धोका सर्वात कमी होता

  • मध्यम अनियमित झोप घेणारे (SRI 71.6-87.3): धोका 8% वाढतो

  • जास्त अनियमित झोप घेणारे (SRI <71.6): धोका 26% वाढतो

Health
महिनाभर चिया सिड्स खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

केवळ पुरेशी झोप घेणं पुरेसं नाही, असंही या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. जर तुम्ही तुमची झोपेची वेळ नियमित ठेवली नाही तर हृदयविकाराचा धोका कमी होत नाही, असंही संशोधकांनी या अभ्यासाद्वारे म्हटलं आहे.

Health
तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती प्रमाणात भात खाल्ला पाहिजे?

झोपेच्या अनियमिततेचे धोके

अनियमित झोपेमुळे शरीराचे २४ तास चालणारे सर्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ असंतुलित होतं. हे घड्याळ केवळ चयापचयच नव्हे तर हार्मोनल एक्टिव्हिटी देखील नियंत्रित करतं. त्याचा त्रास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मधुमेह आणि अगदी मानसिक आरोग्यावरही होण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Health
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

सवयी कशा सुधाराल?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, झोपेची नियमितता राखण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो

  • दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा

  • झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा

  • रात्री हलका आहार घ्या

  • रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिऊ नका

  • झोपेच्या वेळी वातावरण शांत

  • झोपण्यापूर्वी वाचन किंवा ध्यान करण्याची सवय लावा

Health
मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com