Winter Care: थंडीत हृदयविकाराचा धोका का वाढतो? डॉक्टरांनी सांगितलं कारण

Winter Care For Heart Patient: थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. अनेकांना थंडीच हृदयाचे आजार होतात. यामागचे कारण काय हे जाणून घ्या.
Winter Care
Winter CareSaam Tv
Published On

सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. थंडीत अनेकांना खूप जास्त त्रास होतो.थंडीत हृदयाच्या रुग्णांना खूप त्रास होतो. त्यामुळे अनेकदा हॉर्ट अॅटॅक, हॉर्ट ब्लॉकेजचा त्रास होऊ शकतो. विशेषतः थंडीच,हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायची असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यावी याबाबत डॉ. हर्षल इंगळे, हृदयरोग तज्ञ(रुबी हॉल हॉस्पिटल)यांनी माहिती दिली आहे.

Winter Care
World Asthama Day 2024: दमा असलेल्या रुग्णांनी व्यायाम करताना ही काळजी घेणे आवश्यक; अन्यथा वाढतील अडचणी

थंडीमध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या गोठण्याचे प्रमाण खूप जास्त असते. वाढत्या थंडीमुळे हा त्रास होऊ शकतो.ज्यावेळी आपल्या शरीरात रक्ताच्या गुठल्या होतात तेव्हा हृदयावर जास्त ताण येण्याची शक्यता असते.या काळात हृदयाला थोडा जास्त पम्प करावे लागते, त्यामुळे रक्तदाबदेखील वाढू शकतो.

थंडीच्या काळात आपलं खाणं खूप जास्त होतं. त्यामुळेदेखील अनेकदा त्रास होतो. थंडीच्या काळात नेहमी गरम,ऊबदार कपडे घालावेत.रात्रीच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये. रात्री खूप जास्त थंडी असते, त्यामुळे शरीराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे ऊबदार कपडे, हातात हातमौजे घालून बाहेर पडावे.ज्या गोष्टींनी शरीराला हिट मिळेल, असे पदार्थ खावेत. थंडीच्या दिवसात अक्रोड, बदाम या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करावा.

थंडीत हृदयविकाराच्या आजाराचे प्रमाण वाढते का?

थंडीत हृदयविकाराचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढतात. थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हृदयविकाराचे आजार होण्याची शक्यता असते.

थंडीत काळजी कशी घ्यावी?

थंडीत तुम्ही आहारात पथ्य पाळले पाहिजेत. आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करायला हवा.शरीरात हिट राहणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा.

Winter Care
Heart Attack: सावधान ! हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?

ज्या लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी कशी काळजी घ्यायला हवी?

हृदयविकाराचा आजार होण्यासाठी कोणतेही वय उरले नाही. आदरा कोणालाही हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घ्यायला हवी. - ⁠हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही थंडीमध्ये जास्त असते

-थंडीमध्ये विशेषता पहाटेच्या वेळी तीन ते सहा या दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते त्याची शक्यता जास्त असते.सकाळच्या वेळी अनेकदा श्वास घ्यायला त्रास होतो. या सगळ्याकडे आपण दुर्लक्ष करायला नको. त्यामुळे पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो.

Winter Care
Health Tips: रिकाम्या पोटी लसूण-मध खाण्याचे फायदे कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com