Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सालदाराला संपविले; सावद्यातील थरारक घटना

Jalgaon News : चौकशीत मृत सुभाराम बारेला व दोन्ही संशयित यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी संशयित सुकलाल लोहारे व अर्जुन आवासे यांनी सुभाराम झोपेत असताना डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याचे निष्पन झाले आहे

साम टिव्ही ब्युरो

सावदा (जळगाव) : जुना वाद असल्याने या वादातून शेतात सालदाराच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची (Jalgaon) घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेच्या चार तासातच दोन संशयितांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील सावदा शहरामधील कोचूर रस्त्यावर रवींद्र बेंडाळे यांच्या शेतात काम करत असलेला सालदार सुभाराम रिचू बारेला (वय ४५, रा. आंबळी, ता. झिरण्या, जि.खरगोन, मध्य प्रदेश) हा शेतात बांधलेल्या खोलीत राहत होता. दरम्यान, ३० मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास सुभाराम बारेला हा कामावर आला नाही. (Crime News) म्हणून शेतमालकाने चौकशी केली असता शेतातील घरात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. याबाबत लोकेश बेंडाळे यांनी पोलिसांना माहिती दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावदा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या सर्व मजुरांची माहिती घेतली. त्यावरून दोन सालगडी त्यांच्या कामाच्या व राहण्याच्या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यावरून त्यांची माहिती घेण्यास सुरवात केली असता ते त्यांच्या मालकाकडून सकाळीच रोजंदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजले. त्यांचा शोध सुरु केला. या दरम्यान उदळी गावात असलेले संशयित सुकलाल रतन लोहारे (रा. नेपानगर) व अर्जुन मुन्ना आवासे (रा. बऱ्हाणपूर) यांना ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यास आणले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत सुभाराम बारेला व दोन्ही संशयित यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी संशयित सुकलाल लोहारे व अर्जुन आवासे यांनी सुभाराम झोपेत असताना डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT