Nanded News : वांग्याच्या शेतीतून तरुण शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

Nanded News : २० गुंठ्यामध्ये लागवड केलेल्या वांग्यासाठी ३० हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वगळता शिवराज वानोळे या शेतकऱ्याला लाख रुपयाचा निव्वड नफा
Nanded News
Nanded NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतीतून नवनवीन प्रयोग करून शेतकरी चांगले उत्पादन घेत असतात. यात नांदेडच्या बिलोली (Nanded) तालुक्यातील लोहगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने वांग्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेतले आहे. खर्च वजा करता लाख रुपयांचा नफा या शेतकऱ्याला झाला आहे.  (Breaking Marathi News)

Nanded News
Sambhajinagar Corporation : मनपाची १७६ कोटीची विक्रमी कर वसुली; छत्रपती संभाजीनगरात वसुली मोहीम, कर भरण्याची आज शेवटची संधी

नांदेड जिल्ह्यातील लोहगाव येथील शिवराज वानोळे असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शिवराज वानोळे या शेतकऱ्याने (Farmer) आपल्या चार एकर शेतीपैकी २० गुंठे शेतीत वांग्याची लागवड केली. या २० गुंठ्यामध्ये लागवड केलेल्या वांग्यासाठी ३० हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वगळता शिवराज वानोळे या शेतकऱ्याला लाख रुपयाचा निव्वड नफा झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक गणित सुधारले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded News
Bribe Case : आरोग्य कॅम्पसाठी २० हजाराची लाच; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

भाजीपाला शेतीवर भर 

शेती करताना (Cotton) कापूस, ज्वारी, मका अशा पिकांचीच लागवड शेतकरी करत असतात. मात्र या पारंपरिक शेतीसोबत भाजी पाला शेतीकडे शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा, आणि त्यातून आपली आर्थिक उन्नती करावी; असे आवाहन शिवराज वानोळे या तरुण शेतकऱ्याने केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com