Sambhajinagar Corporation : मनपाची १७६ कोटीची विक्रमी कर वसुली; छत्रपती संभाजीनगरात वसुली मोहीम, कर भरण्याची आज शेवटची संधी

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आकारण्यात आलेले घरपट्टी, पाणीपट्टी कराचा भरणा करण्यासाठी महापालिकेकडून आवाहन केले जात होते.
Sambhajinagar Corporation
Sambhajinagar CorporationSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मार्च महिना म्हटला म्हणजे आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस यामुळे कर, थकीत बिल वसुलीवर अधिक भर दिला जात असतो. त्यानुसार (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर मनपा यावर्षी कर वसूलीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. या मोहिमेत यंदा तब्बल १७६ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. (Tajya Batmya)

Sambhajinagar Corporation
Poultry Farm Closed : पाण्याअभावी ५० टक्के पोल्ट्री शेड बंद; अंड्यांचे उत्पादन निम्म्यावर

छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आकारण्यात आलेले घरपट्टी, पाणीपट्टी कराचा (Tax) भरणा करण्यासाठी महापालिकेकडून आवाहन केले जात होते. काही नागरिकांनी भरणा केला जात नव्हता यामुळे वसुली मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान महापालिकेने वसुलीची धडक मोहीम हाती घेतल्यानंतर थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीस बजावून त्यांच्या मालमत्तांचे लिलावाची प्रक्रिया राबवली. त्यामुळे मालमत्ता धारकांनी कर भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Corporation
Nandurbar News : ६५ लाख ३२ हजार किमतीचा गुटखा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कार्यवाही

प्रथमच १५० कोटी वसुली 

याचा परिणाम म्हणून मागील दोन वर्षापेक्षा सर्वाधिक वसूली केली असून पाणीपट्टीची २६ कोटी आणि मालमत्ता कर मिळून १५० कोटी असे तब्बल १७६ कोटी रुपये आता मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहे. वसुलीसाठी आजचा शेवटचा दिवस बाकी आहे. २०२२ मध्ये १४६ कोटी २०२३ मध्ये १४० कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र इतिहासात आतापर्यंत पहिल्यांदाच मालमत्ता कराची वसुली १५० कोटीपेक्षा अधिक झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com