Poultry Farm Closed : पाण्याअभावी ५० टक्के पोल्ट्री शेड बंद; अंड्यांचे उत्पादन निम्म्यावर

Dharashiv News : दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या तर आहेच. परंतु सतत वातावरणातील बदलामुळे पक्ष्यांमध्ये रोग पसरत आहेत.
Poultry Farm
Poultry FarmSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा पाण्याचे संकट गडद होत चालले आहे. पाण्याची समस्या असल्याने प्रामुख्याने पिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. (Dharashiv News) शिवाय अन्य परिस्थितीला देखील तोंड द्यावे लागत आहे. आता पाण्याची समस्या असल्याने पाण्याअभावी पोल्ट्री व्यवसायाला (Poultry Farm) देखील फटका बसला आहे. साधारणपणे ५० टक्के पोल्ट्री शेड बंद पडले आहेत. (Latest Marathi News)

Poultry Farm
Maharashtra Weather Forecast: राज्यात एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा कायम

दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या तर आहेच. परंतु सतत वातावरणातील बदलामुळे पक्ष्यांमध्ये रोग पसरत आहेत. त्यामुळे औषधांवर अधिक खर्च होत असुन पशुसंवर्धन विभागाकडून नोंदणी करून औषधे, लस उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याची मागणी पोल्ट्री व्यवसायाकडुन केली जात आहे. मुळात धाराशिवच्या वाशी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला आहे. (Water crisis) पाण्याअभावी लेअरचे ५० टक्के शेड बंद झाले आहेत. त्यामुळे अंड्याचे (Eggs) उत्पादन घटले आहे.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Poultry Farm
Akola Politics: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; मोठं कारण आलं समोर

व्यवसाय अडचणीत  

अनेकांनी शासकीय योजनांचा लाभ घेत पोल्ट्री व्यवसाय उभारला आहे. मात्र काहींनी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरु केले आहेत. परंतु आता पाण्याची समस्या निर्माण झाल्याने कर्ज काढुन उभारलेले व्यवसाय अडचणीत आले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com