Chhatrapati Sambhajinagar: वसतीगृहामध्ये पाण्याचा ठणठणाट; मध्यरात्री बादल्या घेवून विद्यार्थिनींची थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर धडक

Students March On Vice-Chancellors Bungalow: छत्रपती संभाजीनगरमध्ये मातोश्री विद्यार्थिनी वसतीगृहात गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन केलं आहे.
Students March On Vice-Chancellors Bungalow
Students March On Vice-Chancellors BungalowSaam Tv

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Marathwada University Water Crisis In Hostel

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr Babasahed Ambedkar Marathwada University) मातोश्री विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिनींनी मध्यरात्री थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर धडक दिली आहे. (Latest Marathi News)

दोन दिवसापासून मुलींच्या वसतीगृहामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. वारंवार तक्रार करूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे मध्यरात्री हातात पाण्याच्या बादल्या घेऊन विद्यार्थिनींनी थेट कुलगुरूंच्या बंगल्यावर मोर्चा काढला (Marathwada University Water Crisis) आहे. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास या विद्यार्थिनींनी थेट कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या बंगल्यासमोर हातात रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या आंदोलन केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थिनींना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांना इतर वसतीगृहामध्येत पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र समोर ( Girl Students) आलं. त्यामुळे 100 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन (Water Crisis) केलं आहे.

पाण्यावर तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार या विद्यार्थिनींनी केला होता. त्यांनी कुलगुरूंच्या बंगल्याच्या आवारात धाव घेतली होती. या तीव्र आंदोलनानंतर सुद्धा कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडून बराच वेळ कोणताच संपर्क साधण्यात आला (Girl Students March) नाही, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

Students March On Vice-Chancellors Bungalow
BAMU University : छेडछाडीनंतर विद्यापीठ प्रशासन ॲक्शन मोडवर; सायंकाळी साडेसहानंतर नो एन्ट्री, कुलसचिवांचा निर्णय

मराठवाडा विद्यापीठात पाण्यावरून वातावरण तापल्याचं समोर आलं आहे. अखेर रात्री साडेबारानंतर कुलगुरू घराबाहेर आले. त्यांनी विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनींना मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं (Chhatrapati Sambhajinagar news) आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाणी संकट जाणवत आहे. वस्तीगृहामध्ये पाणी नसल्यामुळे विद्यार्थिंनींनी थेट कुलगुरूंचा बंगला गाठला आहे.

Students March On Vice-Chancellors Bungalow
BAMU NEWS: प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ३३ महाविद्यालये अपात्र! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com