Students Refund Exam Fee : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत; बँक खात्यात जमा होणार रक्कम

Sambhajinagar News : सध्या दहावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून बारावीच्या परीक्षा देखील सुरु आहेत. त्याचवेळी परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र काढले आहे
Students Refund Exam Fee
Students Refund Exam FeeSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील (Sambhajinagar) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेच शुल्क परत मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले हे शुल्क संबंधित (Student) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. (Latest Marathi News)

Students Refund Exam Fee
Nandurbar Tiger Worship : सातपुड्याचा जंगलातील आदिवासींची अनोखी प्रथा; बांधव करतात वाघांची पूजा, नेमकं कारण काय?

सध्या दहावीच्या परीक्षा (SSC Exam) अंतिम टप्प्यात असून बारावीच्या परीक्षा (HSC Exam) देखील सुरु आहेत. त्याचवेळी परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र काढले आहे. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सरकारने नोव्हेंबर महिन्यात १५ जिल्ह्यातील ४० तालुके आणि १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. या भागातील विद्यार्थ्यांना हे शुल्क माफ करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Students Refund Exam Fee
Manoj Jarange: तुमचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

मुख्याध्यापकांकडून मागविली माहिती 

संबंधित भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांकडून पात्र विद्यार्थ्यांच्या याद्यांसह बँक खात्याची देखील माहिती मागवली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्काच्या प्रतिकृतीची रक्कम जमा करण्यात येईल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com