Student Internet Activities: मुलं अभ्यास सोडून मोबाईलवर काय पाहतात? प्रत्येक पालकाला माहित असावी, अशी महिती रिपोर्ट्समधून उघड

Internet Activities In India: एका अहवालातुन मोठा खुलासा झाला आहे. भारतात अतिशय कमी लोकं ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट वापरतात, तर इंटरनेटचा सर्वाधिक वापर मनोरंजन आणि इतर कामांसाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे.
Internet Activities In India
Internet Activities In IndiaYandex
Published On

Indians Top Internet Activities

आईवडिलांना वाटतं की, आपली मुले इंटरनेटवर अभ्यास करत आहेत. प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये, इंटरनेटचा वापर अभ्यास कमी आणि इतर गोष्टींसाठी जास्त केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भारत देश ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे, असं इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच IAMAI च्या 2023 च्या अहवालानुसार स्पष्ट झालं (Student Internet Activities) आहे.  (latest marathi news)

अहवालानुसार, भारतात सर्वात मजेदार गोष्टी ऑनलाइन पाहिल्या जात आहेत. अहवालानुसार, भारतातील सुमारे 86 टक्के लोक इंटरनेटवर व्हिडिओ, ऑडिओ आणि ओटीटी ॲप्सचा आनंद (IAMAI Report) घेतात. सर्वाधिक मनोरंजनाचे व्हिडिओ खेड्यांमध्ये ऑनलाइन पाहिले जातात. ग्रामीण भारतात सुमारे 53 टक्के लोक व्हिडिओ, ऑडिओ आणि ओटीटी ॲप्स वापरतात. मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आहे. छोट्या शहरांमध्ये हा आकडा 23 टक्के आहे, तर केवळ 3 टक्के लोक ऑनलाइन अभ्यास करतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय इंटरनेटवर काय पाहतात?

51 टक्के भारतीय संवादासाठी म्हणजेच एखाद्याशी बोलण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. यातही खेड्यातच जास्त वापर केला जात असल्याचं स्पष्ट झालं (Indians Top Internet Activities) आहे. लहान शहरे आणि मेट्रो शहरातील लोकं कमी ऑनलाइन संवाद साधतात. भारतात 70 टक्के लोक इंटरनेटवर सोशल मीडिया वापरतात. यामध्येही गावातील लोकांची संख्या जास्त आहे.

केवळ 53 टक्के भारतीय ऑनलाइन गेमिंग करतात. इंटरनेटद्वारे निव्वळ व्यापार करणारे भारतीय 52 टक्के आहेत. याशिवाय ४५ टक्के भारतीय इंटरनेटद्वारे डिजिटल पेमेंट करतात. तर ऑनलाइन सुरू करणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३ टक्के (Top Internet Activities) आहे.

Internet Activities In India
गरीबांना स्वस्तात Internet! TRAI कडून फक्त 200 रुपयांचा सब्सिडी प्लान, असा होणार फायदा!

इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या (Internet Activities In India)

  • भारतातील इंटरनेट वापरकर्ते - 707 दशलक्ष

  • OTT, व्हिडिओ, ऑडिओ - 621 दशलक्ष

  • संवाद - 575 दशलक्ष

  • सोशल मीडिया - 438 दशलक्ष

  • ऑनलाइन गेमिंग - 427 दशलक्ष

  • नेट कॉमर्स - 427 दशलक्ष डिजिटल पेमेंट - 370 दशलक्ष

  • ऑनलाइन शिक्षण – 24 दशलक्ष

Internet Activities In India
Don't Do This Things While Using Internet : थांबा! गुगलवर सर्च करताना चुकूनही करु नका या ७ चुका, व्हाल कंगाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com