इंटरनेट नसताना G-MAIL ऑफलाईन कसं वापरायचं? वाचा स्टेप बाय स्टेप

How To Use G-mail Offline : इंटरनेट ही काळाची गरज आहे. इंटरनेटशिवाय कोणताही गोष्ट करणे खूप अवघड असते. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमचा ई- मेल आयडी असणे खूप महत्त्वाचे आहे.
G-mail Using Offline
G-mail Using OfflineSaam Tv
Published On

Steps For G-mail Use Offline :

इंटरनेट ही काळाची गरज आहे. इंटरनेटशिवाय कोणताही गोष्ट करणे खूप अवघड असते. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमचा ई- मेल आयडी असणे खूप महत्त्वाचे आहे. ई- मेल आयडीवर आपली सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते.

ई-मेल वापरताना नेहमी इंटरनेट (Internet) असणे गरजेचे असते. परंतु जर कधी इंटरनेट नसेल तर ई-मेल वापरता येणार नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला ऑफलाइन Gmail कसं वापरायचं हे सांगणार आहोत.

ऑफलाइन ई-मेल कसं वापरायचं?

  • सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझरवर Gmail ओपन करा.

  • यानंतर स्क्रिनच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्ज गियरवर क्लिक करा.

  • यानंतर Settings पर्याय निवडा.

  • यानंतर तिथे असलेल्या ऑफलाइन (Offline) टॅपवर क्लिक करा.

G-mail Using Offline
Aadhaar Card Update : सावधान ! UIDAI ने केले अलर्ट, तुम्हीही WhatsApp आणि Gmail वरून आधार कार्ड शेअर करता? वाचा सविस्तर
  • यानंतर ऑनलाइन ई-मेल बॉक्स चेकमार्क करा.

  • त्यानंतर ऑफलाइनसाठी तुम्हाला किती दिवस ई-मेल सिंक करायचे आहे त्यावर क्लिक करा. (तुम्ही फक्त 90 दिवसांसाठी ऑफलाइन ई-मेल वापरु शकता.)

  • यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवर ऑफलाइन डेटा ठेवायचा की नाही. हे सिलेक्ट करा.

  • त्यानंतर सेव्ह चेजेंस वर क्लिक करा.

  • ऑफलाइन ई-मेल कसा वापरायचा

  • तुम्ही ऑफलाइन मोडवर गेल्यावर, तुमच्या क्रोम ब्राउझरमधील mail.google.com वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्ही ऑफलाइन असल्याचा एक मेसेज तुम्हाला दिसेल.

G-mail Using Offline
Spam Mails : Gmail च्या Spam मेलमुळे वैतागले आहात ? कसे कराल ब्लॉक, या स्टेप्स करा फॉलो

आता तुम्ही तुमचा इन बॉक्स ब्राउझ करु शकता. ईमेल वाचू शकता. पाठवू शकते. ड्राफ्ट्स तुम्ही सेव्ह करु ठेवा. त्यानंतर तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर हे ई-मेल ऑटोमॅटिक पाठवले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com