BAMU University : छेडछाडीनंतर विद्यापीठ प्रशासन ॲक्शन मोडवर; सायंकाळी साडेसहानंतर नो एन्ट्री, कुलसचिवांचा निर्णय

BAMU University Registrar Decision: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. कुलसचिवांनी याप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे.
BAMU University
BAMU UniversitySaam Tv
Published On

BAMU University Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (BAMU University) काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विद्यापीठ प्रशासन चांगलंच अलर्ट मोडवर आलं आहे. कुलसचिवांनी याप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊ या. (Latest Crime News)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 दिवसांपूर्वी झालेल्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीनंतर आता विद्यापीठ प्रशासन चांगलंच ॲक्शन मोडवरती (BAMU University Registrar Decision) आलंय. विद्यापीठात सायंकाळी साडेसहा वाजेनंतर आता टवाळखोर, रिकामटेकड्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. सोबतच प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक व्हिजीटरची चौकशी देखील केली जाणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विद्यापीठात विद्यार्थिनींची छेडछाड

मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनीची बुलेटवर आलेल्या काही टवाळखोर तरुणांनी रात्री 8 वाजता छेड काढली होती. तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Sambhajinagar News) होता. विद्यापीठातील वाय कॉर्नरवर हा संपूर्ण प्रकार घडला होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायंकाळी 6 सुमारास या विद्यार्थिनी फिरण्यासाठी वस्तीगृहाच्या बाहेर पडल्या होत्या. तेव्हा तेथे आलेल्या काही टवाळखोर तरुणांनी छेड काढत एका विद्यार्थिनीला बळजबरीने बुलेटवर बसून अपहरण करण्याचा प्रयत्न (Student molestation) केला. आरडाओरड केल्यानंतर परिसरातील काही विद्यार्थी जमा झाले, तेवढ्यात टवाळखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.

BAMU University
Shindkheda Crime : ओढणीने गळा आवळून मुलीची हत्या; संशयातून मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न

त्याअगोदर पुंडलिक नगर भागातील एका विद्यार्थिनीची छेड काढण्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. विद्यापीठात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यापार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सायंकाळी साडेसहा वाजेनंतर आता टवाळखोर, रिकामटेकड्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना प्रवेश मिळणार (BAMU University no entry in campus) नाही. तसंच विद्यापीठ परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.

BAMU University
Pune Crime News: खळबळजनक! येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com