Pune Crime News: खळबळजनक! येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Yerawada Central Jail: मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे ठोस कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

Pune News:

पुण्यातील येरवडा कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime News
Pune Accident: रस्त्याचा अंदाज चुकल्याने भीषण अपघात! बोलेरो जीप १५० फूट दरीत कोसळली; सुदैवाने चालक बचावला

येरवडा पोलीस ठाण्यात सदर घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे ठोस कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भोरविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्याची १६ जुलै २०२३ रोजी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. गेल्या ७ महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

कैद्यांना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी कारागृहाच्या आवारात सोडण्यात आले. तेथील मेडिकल स्टोअरच्या बाजूला मोकळ्या जागेत मंगेशचा मृतदेह आढळून आला. त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्यावर कारागृहात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हेगारी विश्वात आल्यावर प्रत्येकालाच आपल्या कर्माची शिक्षा भोगावी लागते. मात्र या सर्वांमध्ये शिक्षा भोगत असताना असे जीवन जगण्यापेक्षा मृत्यू परवडला असा विचार अनेक कैद्यांच्या मनात येतो. त्यामुळे कैदी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न करतात. कारागृहांमध्ये कैद्यांनी आत्महत्या केल्याच्या आजवर बऱ्याच घटना समोर आल्या आहेत.

Pune Crime News
Mumbai Crime News: RTI मधून माहिती मागवल्याचा राग, घरात घुसून दिली जीवे मारण्याची धमकी; सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com